बारामती, 19 फेब्रुवारीः नागरी क्षेत्रामधील गरिबी कमी व्हावी, तसेच महिला भगिनींना देखील स्वयंरोजगाराची एक संधी उपलब्ध व्हावी, याकरिता बारामती नगर परिषदेकडून मोफत ब्युटी पार्लरचे परिपूर्ण क्लासेस सुरू करण्यात यावेत. ज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना प्राधान्य असावे. अशा स्वरूपाचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया (आठवले) पक्षामार्फत बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना शनिवारी, 18 फेब्रुवारी 2023 रोजी देण्यात आले.
शशिकांत वारिशे यांना श्रद्धांजली वाहिली
यावेळी रत्नप्रभा साबळे (महिला अध्यक्षा पुणे जिल्हा), पूनम घाडगे (महिला शहराध्यक्षा), सुनील शिंदे (पश्चिम महाराष्ट्र सचिव), विजय सोनवणे (पश्चिम महाराष्ट्र संघटक), रविंद्र सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा), संजय वाघमारे (तालुकाध्यक्ष), माऊली कांबळे (तालुका सरचिटणीस) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीत काळाबाजार करणाऱ्या गॅस रिफील सेंटरवर छापा
One Comment on “मोफत ब्युटी पार्लरचे परिपूर्ण क्लासेससाठी आरपीआयची मागणी”