बारामती, 31 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि. 31 जुलै) बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेतली. यावेळी आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महेश रोकडे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. तसेच या ठिकाणी 24 तास सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पहा व्हिडिओ –
https://youtu.be/nIK_3c9M5Ho?si=r2tHtwwvFbbnL-pG
यासोबतच आरपीआय (आठवले) पक्षाच्या आंदोलनाची दखल घेऊन ज्या प्रकारचे बारामती शहरातील झोपडपट्टी भागात काही ठिकाणी विद्युत पोल बसविण्यात आले आहेत, अशाच प्रकारे शहरातील उर्वरित झोपडपट्टी भागांत देखील विद्युत पोल बसविण्यात यावेत, अशी मागणी आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
या सर्व मागण्यांचे लेखी निवेदन आज आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा महिला सरचिटणीस रजनी साळवे, सामाजिक कार्यकर्ते शुभम चव्हाण आणि आश्विन धेंडे देखील उपस्थित होते.