विधानसभेसाठी आरपीआय (आठवले) पक्षाला ‘ऊसधारक शेतकरी’ चिन्ह देण्यात आले

मुंबई, 23 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला ऊसधारक शेतकरी (गन्नाकिसान) निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उमेदवार ऊसधारक शेतकरी चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष जिल्हावार पदाधिकारी राज्य कार्यकारिणी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आघाड्या यांनी सर्व विधानसभा मतदारसंघ तयारी करावी व चिन्ह घरोघरी पोहचावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरच विधानसभा निवडणुकीची पुर्वतयारी रिपब्लिकन पक्षाचे विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *