मनोज जरांगे यांना रोहित पवारांचा पाठिंबा, अन्नत्याग करणार!

शिरूर,  26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आरक्षण आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, रोहित पवार हे आज (दि.26) एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. याची घोषणा रोहित पवार यांनी त्यांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान केली. ते काल शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एका सभेत बोलत होते.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय!

“मनोज जरांगे पाटील हे आज उपोषणाला परत बसत आहेत. आमची ही संघर्ष यात्रा युवकांच्या हिताची आहे. युवकांना काम मिळाले पाहिजे. तसेच त्यांच्या शिक्षणाच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. सध्याच्या काळात शिक्षण महाग होत चालले आहे. तसेच नोकऱ्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीत तिथं एक सामाजिक कार्यकर्ता जर उपोषण करत असेल तर सरकारने पुढाकार घ्यावा. तुम्ही काही महिन्यांपूर्वी ईडब्लूएस कोट्यासाठी घटना दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकता. तर मग मराठा आणि धनगर समाजासाठी तुम्ही पुन्हा एकदा का मर्यादा ओलांडू शकत नाही?” असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे. यासोबतच राज्य सरकारने मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण द्यावे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण उद्या एक दिवस अन्नत्याग करणार आहे, असे रोहित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र

तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. “माझे हे आमरण उपोषण एकदम कडक आणि कठोर असणार आहे. या काळात मी ना अन्न घेणार ना पाणी, ना कोणतीही वैद्यकीय सेवा अथवा ना वैद्यकीय उपचार घेणार. तसेच या उपोषणादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला आमच्या गावात प्रवेश नाही”, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

One Comment on “मनोज जरांगे यांना रोहित पवारांचा पाठिंबा, अन्नत्याग करणार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *