बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा टोला

बारामती, 10 सप्टेंबरः नुकताच भाजपचे नतून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा झंझावती दौरा केला. या दौऱ्यात बावनकुळेंच्या एका विधानाची मोठी चर्चा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदार संघातून भाजपने हरवले आणि आता बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंना आम्ही हरवणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळेंचं ते विधान होतं. बावनकुळेंच्या या विधानावर, ‘आमचा बारामतीकरांवर विश्वास आहे’ असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

बारामतीत जलकुंडांऐवजी वाहत्या पाण्यात गणेश मुर्ती विसर्जनास पसंती

दरम्यान, पुण्यात 9 सप्टेंबर 2022 रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार हे सहभागी झाले होते. मानाचा तिसरा गणपती गुरजी तालीम मित्र मंडळ समोर ढोल वादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी रोहित पवार यांनी संवाद साधला.

यामुळंच भाजपाला बारामती हवीशी वाटतेय- सुप्रिया सुळेंचा भाजपला चिमटा

‘बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या बातम्या होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. आज बारामती पवार मुक्त करायची, मुंबई ठाकरे मुक्त करायची या दोन विषयांवर भाजपचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकर्‍यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.

बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा दावा करणार्‍या भाजपा नेत्यांना सुनावताना रोहित पवार म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तिथं झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय, त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे, अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *