सिमावादावरून रोहित पवार आक्रमक!

पुणे, 24 डिसेंबरः पुण्यात काल, 23 डिसेंबर 2022 पासून भिमथडी जत्रेला सुरुवात झाली आहे. या भीमथडी जत्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली आहे. नुकतेच ते नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन हजेरी लावून पुण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादचे पडसादही सोशल मीडियावर पडताना दिसत आहेत. नुकताच कर्नाटक सरकारने एक इंचही महाराष्ट्र राज्याला देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधीमंडळात एक मताने पारित केला आहे. या अनुषंगाने कर्नाटक सरकार महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील गावांना आमिष देत आहेत.

अखिर भारतीय मराठा महासंघाच्या बॅनरवरून शरद पवार गायब?

महाराष्ट्र सरकार विरोधात बोलून स्वतःहून कर्नाटकमध्ये जायची तयारी दाखवल्यास शेतीसाठी मोफत वीज आणि कर्नाटकमधील विविध योजना तातडीने लागू करण्याचं आमिष कर्नाटक सरकार सीमेवरच्या गावांना दाखवत असल्याची माहिती अक्कलकोट तालुक्यातील पालापूर या सीमेवरच्या गावातील किरण जगताप यांनी भीमथडी जत्रेत रोहित पवार यांना दिली.

बारामतीत वीज कर्मचारी, अभियंता संघटनेची निषेधार्थ रॅली

यावर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आज, 24 डिसेंबर 2022 रोजी ट्वीट केले आहे. ‘अशी आमिषे दाखवूनही महाराष्ट्र सोडणार नाही, या भूमिकेवर हे ग्रामस्थ ठाम आहेत. सीमावादावर महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलं असलं, तरी सीमेवर राहणारे आणि महाराष्ट्रावर प्रेम असलेले मराठी बांधव मात्र जागृत असून, याबाबत त्यांचा अभिमान वाटतो.’, असे ट्वीट त्यांनी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *