मुर्टी गावात कावडीचे विधिवत पूजन

बारामती, 1 एप्रिलः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावात 31 मार्च 2023 रोजी सासवड येथील तेल्या भुत्याची कावडीचे आगमन झाले. सदर कावड मुर्टी गावातील गदादे वस्ती येथे आल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले.

मुर्टीचा बाजार लिलाव पुन्हा जाहीर

सदर कावडीचे पूजन मुर्टी गावच्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गदादे वस्तीवरील ग्रामस्थांकडून कावडीबरोबर असणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे, हरि जगदाळे, नंदू शिंदे, नानासाहेब गदादे, भाजप बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे, संतोष गदादे, सुरेश गदादे यासह इतर ग्रामस्थ हजर होते.

राजुरीत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त कुस्तीचे आयोजन

कावडीचा कार्यक्रम विद्युत पूजन करुन करण्यात आले. यावेळी शंभू महादेवाची आरती देखील घेण्यात आली.

One Comment on “मुर्टी गावात कावडीचे विधिवत पूजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *