बारामती, 19 जानेवारीः बारामती एमआयडीसी येथील वसंतराव पवार लॉ कॉलेज आणि विद्या प्रतिष्ठानचे आर्ट सायन्स कॉमर्स या महाविद्यालयांना स्वतःचे पार्किंग नाही. यामुळे विद्यार्थी भिगवण रोडला व एमआयडीसीच्या सर्व्हिस रोडला वाहनांचे पार्किंग बेशिस्तपणे करत आहेत.
उंडवडी सुपे येथे भरधाव स्कॉर्पिओची एसटी आणि डंपरला धडक
वाहनांचे पार्किंग हे रस्त्याच्या दोन्ही बाजूने केल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दुधाचे टँकर तर मुख्य रोडला पार्किंग केले जात असल्याने मुख्य रोडवर अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. याला जबाबदार कोण?
वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शेकडो गाड्या ह्या रस्त्यावर पार्किंग झाल्यामुळे रस्ते बंद होण्याची वेळ आली आहे. यावर एमआयडीसीचे परिवहन अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत. ह्या गाड्या व टँकर बेशिस्तपणे रोडवर पार्किंग केल्यामुळे अपघात व वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढतच चालले आहे. तरी बेकायदेशीरपणे रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून होत आहे, असे ‘भारतीय नायक’चे पत्रकार सम्राट गायकवाड यांनी सांगितले आहे.
2 Comments on “विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका”