नीरा येथे रिपाइं (आठवले) पक्षाचे शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

नीरा, 26 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. नीरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा या कार्यक्रमांचे आयोजन रिपाइं (आठवले) पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार आणि पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल कांबळे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून करण्यात आले होते.



हा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.



याप्रसंगी, पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा प्रभारी विक्रम शेलार, पुणे जिल्हा ज्येष्ठ सरचिटणीस गणेश गायकवाड, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे, पुरंदरचे नेते गौतम भालेराव यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *