बारामती, 28 सप्टेंबरः माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. तसेच 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतूदी आणि कार्यपद्धतींना व्यापक प्रसिद्धी दिली जाते. यामुळे बारामती नगरपरिषदेने माहिती अधिकार दिवस साजरा केला आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज, 28 सप्टेंबर 2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम, 2005 संबंधी प्रशिक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.
आरपीआय(आ) च्या बारामती तालुकाध्यक्ष पदी संजय वाघमारे
या प्रशिक्षणामध्ये अॅड. प्रणिता जावळे, अॅड, धिरज लालबिगे व अॅड.मिनल भंडारी यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी/कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदरहू वेळी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत प्रश्न मंजूषेचा कार्यक्रमही संपन्न झाला.
तसेच शहरातील शाळा, कॉलेज व नगर परिषदेच्या शाळांमध्ये माहितीचा अधिकार संबंधी जनजागृतीसाठी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नगर परिषदेच्या शाळा क्र.1 ते 8 मध्ये परिपाठात माहिती अधिकार अधिनियम, 2005 विषयी माहिती देण्यात आली. तसचे सदरहू शाळांमध्ये चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्वा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आदीचे आयोजन करून माहिती अधिकार दिवस साजरा करण्याात आला.
बारामतीत माळावरची देवीचे सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन; मात्र..