दौंड, 7 ऑगस्टः दौंड तालुक्यातील कमी पावसाच्या पट्ट्यात भात शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. खडकी गावात येथील शेतकरी संदीप काळे आणि रंगनाथ काटे यांनी एकत्रित 3 एकर क्षेत्रावर इंद्रायणी जातीच्या भात पिकाची लागवड केली आहे.
बारामतीत भाजपची यशपाल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
खडकी भागातही कमी पाऊस असलेल्या जमिनीत काळे आणि काटे यांनी भाताची रोपे तयार करण्यात यश मिळवले आहे. लागवडीनंतर भात रोपे आता तरारू लागली आहेत.
ऊस आणि कांदा ही पिके घेण्यासाठी प्रसिद्ध असणार्या खडकी गावात भात शेतीचा प्रयोग यशस्वी झाला, तर अनेक शेतकरी पुढील काळात या पिकाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहू शकतात, अशी अपेक्षा भात पीक घेणारे संदीप काळे यांनी व्यक्त केली आहे.