बारामती, 10 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ येथे शुक्रवारी (दि. 09 ऑगस्ट) क्रांतीदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका स्वातंत्र सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र उत्तराधिकारी संघटनेचे निलेश कोठारी यांनी केले होते. तसेच यावेळी केएसीएफ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गायले. याप्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात भिगवण चौक दणाणून गेला होता. शेवटी वंदेमातरमाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला पोलीस प्रशासन, बारामती नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान, 1942 साली मुंबई येथील (गोवालिया टँक) ऑगस्ट क्रांती मैदान येथे भारत देश ब्रिटीशांच्या हुकूमशाहीतून मुक्त करण्याकरीता महात्मा गांधी यांनी चले जाव आणि भारत छोडोचा नारा दिला होता. तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतील भिगवण चौकातील वंदेमातरम चौक येथील हुतात्मा स्तंभ याठिकाणी काल क्रांतीदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव जगताप, संचालक योगेश जगताप, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रीय सचिव युवक कॉंगेसचे सी.पी.मिना, अध्यक्ष पुणे जिल्हा युवक कॉंग्रेस उमेश पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. अशोक इंगुले, पुणे जिल्हा सचिव युवक कॉंग्रेस वीरधवल गाडे, राष्ट्रवादी कॉंगेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संदीप गुजर, युवकाध्यक्ष सत्यव्रत काळे, महिला अध्यक्षा वनिता बनकर, शिरीष कुलकर्णी, वैभव कोठारी, स्वप्निल मुथा, ऍड. नंदकुमार भागवत, नवनाथ बल्लाळ, शुभम अहिवळे, संध्या बोबडे, नितीन शेंडे, ऍड. आकाश मोरे, शाम पोटरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड, पत्रकार तैनूर शेख, पत्रकार मन्सूर शेख, संतोष जगताप, रितेश सोळंकी, कुणाल बोरावके, अमोल धर्माधिकारी, एमआयएम जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख, रितेश सावंत, संजय लालबिगे तसेच अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच स्वातंत्र्य सेनानी पत्नी जयश्री किर्वे, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब व उत्तराधिकारी यतीन कोठारी, चंद्रकांत जामदार, दिलीप तांबे, मोहनराव रणदिवे, जीवन मोदी, सुरज मुळीक, धनंजयकुमार जगताप, शामराव जगताप, विक्रांत जामदार, डॉ. मंगेश खंडागळे, शेखर कोठारी, कबीरभाई तांबोळी, स्वानंद करंदीकर, प्रमोद किर्वे, वकील इनक्लब शेख, वकील रमेश कोकरे, वकील रिजवान शेख, वकील मुकुंद बडवे, महादेव साळुंके, पवन घोरपडे, वर्षा किर्वे, पोपट गादीया, स्वानंद खंडागळे, प्रताप सावंत, कुणाल गलिंदे, दिलीप गुरव, सुभाष खंडागळे, रमेश भोकरे, रमेश मोरे, विश्वासराव नागवडे, रमेश रणदिवे, श्रीराम देशमुख, सुश्मिता साळुंके, सुरेश समर्थ आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, बारामती नगरपरिषदेतर्फे राज्यशासनाने 9 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रतिज्ञा, रॅली, पदयात्रा, राष्ट्रध्वज व तिरंग्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे व तिरंग्याशी जोडण्यासाठी उपक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बारामती नगरपरिषदेच्या स्नेहल घाडगे व निलेश कोठारी यांनी उपस्थितांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणवून घेतली.