महसूल विभागाचा बदल्यातील बेकायदेशीर धंदा!

बारामती, 10 डिसेंबरः बारामती तहसील कार्यालयात एक अव्वल कारकून गेले 17 वर्षे बारामती तहसिल कार्यालयमध्ये कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. सविस्तर हकीकत अशी आहे की, महसूल विभागचे सगळे नियम धाब्यावर बसून एक महिला कर्मचारी गेले 17 वर्षे बारामती तहसिल कार्यालयमध्ये कार्यरत राहतेच कशी? अशी चर्चा सध्या जनसामान्यांमध्ये सुरु झाली आहे.

तब्बल 26 ग्रामपंचायतीत एकही बिनविरोध नाही

दरम्यान, सदर महिलेची बदली इंदापूर येथे 2014 ते 2015 या काळात झाली होती. परंतु आर्थिक व राजकीय हितासंबंधी पोटी 3 महिन्यांमध्ये सदर बदली रद्द बाद करून पुन्हा बारामती तहसिलमध्ये सदर महिलेची बदली करण्यात आली. विशेष म्हणजे सदर महिलेला सर्व मिळालेले पद, पदोन्नती बारामती तहसिलमध्येच मिळालेली आहे.

पदोन्नती होऊनही बदली झाली नाही, तर ती तात्काळ रद्द बाद बदली करण्यात आली आहे. म्हणजेच ‘चहा पेक्षा किटली गरम!’ अशा परीस्थितीत सदर कर्मचाऱ्याचा त्रास हा सर्वसामान्य लोकांना होत आहे. याबाबत काही लोकांनी, प्रबुद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष तथा आरपीआयचे शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, संस्थापक सम्राट गायकवाड, उपाध्यक्ष मोईन बागवान यांनी बारामतीचे प्रांताधिकारी यांच्याकडे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र सदर विषयात माझ्या काही संबंध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

शरद कृषी महोत्सवाला अजित पवार देणार भेट

या प्रकरणामध्ये सदर महिला कर्मचाऱ्याशी कोणाचे आर्थिक व राजकीय वर्धास्थान आहे का?, हे समजण्या पलीकडे आहे. सदर महिला कर्मचाऱ्याला नेहमी कमाईचे पदस्थान मिळत आहे. त्या पदभाराचा मिळणारा लाभ कोणा-कोणाकडे मिळतो, हे न समजण्याइतके जनता वेडी नाही.

2 Comments on “महसूल विभागाचा बदल्यातील बेकायदेशीर धंदा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *