बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 चे आरक्षण जाहीर

बारामती, 13 जूनः बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 चे आरक्षण सोडतीसंदर्भात आज, सोमवारी (13 जून) परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात बैठकीचा कार्यक्रम खडी जंगीच्या वातावरणात पार पडला. मात्र अखेर 20 प्रभागातील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 19 मध्ये प्रत्येकी दोन आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रत्येकी तीन जागा असणार आहेत. या आरक्षण सोडतीनुसार 20 प्रभागातील 21 जागांवर महिलांचे आरक्षण पडले आहे. तर या 21 मध्ये 17 सर्वसाधरण महिलांसाठी राखीव आहेत, तर 4 जागांसाठी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे.

प्रभाग क्रमांक 1 अ, 12 अ, 13 अ आणि 19 अ मध्ये अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित प्रभाग क्रमांक 2 अ, 3 अ, 4 अ, 5 अ, 6 अ, 7 अ, 8 अ, 9 अ, 10 अ, 11 अ, 14 ब, 15 अ, 17 अ, 18 ब, 20 ब आणि क असे 17 जागांवर सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

तर सर्वसाधारण (पुरुष) आणि अनुसूचीत जाती (पुरुष) साठी 20 जागांवर पुरुषांसाठी राखीव ठेण्यात आले आहे. यात अनुसूचित जातीसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

यात प्रभाग क्रमांक 14 अ, 16 अ, 18 अ आणि 20 अ या 4 जागांवर अनुसूचित जाती (पुरुष) साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 1 ब, 2 ब, 3 ब, 4 ब, 5 ब, 6 ब, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 13 ब, 15 ब, 17 ब आणि 19 ब या 16 जागांवर सर्वसाधरण (पुरुष) साठी राखीव ठेवण्यात आला आहे.

सदर आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, एआयएमआयएम, अपक्ष आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *