बारामतीत रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

बारामती, 23 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने बारामती येथील उत्पन्न समिती रयत भवन याठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा हा कार्यकर्ता मेळावा दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे आणि पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी भारतीय नायक च्या प्रतिनिधीशी बोलताना यांनी दिली आहे.



या कार्यकर्ता मेळाव्याला आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे, तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, महिला तालुकाध्यक्षा सिमा चोपडे, महिला तालुका कार्याध्यक्षा पूनम घाडगे, महिला जिल्हा सरचिटणीस रजनी साळवे, सविता गायकवाड, प्रमोद खंडागळे, सिमा घोडपडे, आण्णा लांडगे आदी आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहर व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *