मुंबई, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (दि.09) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी अधिकृत निवेदन जारी करून रतन टाटा यांच्या निधनाची बातमी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.
https://x.com/PTI_News/status/1844081171669619007?t=ohReGZD4_Vf0qpbTVs92kQ&s=19
1991 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष
दरम्यान, रतन टाटा यांना त्यांच्या साधेपणा आणि हुशारीमुळे ओळखले जात होते. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष कऱण्यात आले होते. अध्यक्ष झाल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनीं टाटा नॅनो, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांसारख्या अनेक कंपन्या स्थापन केल्या. त्यामुळे लाखो करोडो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. दरम्यान, रतन टाटा हे 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले. रतन टाटा यांच्या कामगिरीमुळे टाटा हा ब्रँड जगभरात प्रसिद्ध झाला. त्यामुळे रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
https://x.com/ANI/status/1844086575451586789?t=Ui2yPpn46kXVkTKRnQNG4Q&s=19
प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली होती
काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आली होती, यावेळी रतन टाटा यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या वृत्ताचे खंडन केले होते. परंतु, रतन टाटा यांच्या निधनामुळे औद्योगिक जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. सध्या देशभरातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
https://x.com/narendramodi/status/1844082603164602476?t=WWvYB6lu6bPf7zJahy17tA&s=19
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे. “श्री रतन टाटा जी एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. याव्यतिरिक्त त्याचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. आपल्या नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे त्यांनी अनेकांमध्ये आपली छाप पाडली. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती मी शोक व्यक्त करतो. ओम शांती.” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.