नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांची कामे त्वरीत व्हावीत, तसेच नवीन इमारतीत होणारी नागरिकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याच्या हेतूने असे केल्याचे बानपच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना माहिती दिली आहे.
बानपचे जन्म मृत्यू, आवक जावक, नागरिक सुविधा केंद्र स्थालांतर

बारामती, 4 जुलैः बारामती नगर परिषदेच्या सुसज्ज अशा नवीन इमारतीमधील जन्म-मृत्यू विभाग, आवक जावक विभाग आणि नागरिक सुविधा केंद्र याचे स्थालांतर करण्यात आले आहे. सदर विभाग हे बारामती नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत सुरु करण्यात आले आहे.