दिल्ली, 17 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे 19 किलोंचे व्यावसायिक गॅस सिलिंडर 57.50 रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे नवीन दर कालपासून लागू झाले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली होती. याचा फटका व्यवसायिकांना बसला होता. मात्र आता गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे व्यवसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्यात आज ओबीसींची महाएल्गार सभा
या नवीन दरानुसार, दिल्लीमध्ये 19 किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर सध्या 1775.50 रुपयांना मिळत आहे. तर यापूर्वी हा गॅस सिलिंडर 1833 रुपयांना मिळत होता. तसेच मुंबईत आता व्यावसायिक गॅस सिलिंडर 1728 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी हा गॅस सिलिंडर 1785.50 रुपयांना मिळत होता. यासोबतच कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1885.50 रुपयांना, तर चेन्नईमध्ये हा गॅस सिलिंडर 1942 रुपयांना मिळत आहे.
राज्यात झिका व्हायरसचे 5 रुग्ण
दरम्यान, एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट यांसारख्या ठिकाणी केला जातो. या दर कपातीमुळे हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे मात्र स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या 30 ऑगस्टपासून 14.2 किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडर 902.50 रुपयांना मिळत आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांची कपात केली होती. त्याचवेळी उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांसाठी सबसिडी 200 रुपयांवरून 400 रुपये करण्यात आली होती.
One Comment on “व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात”