बारामती, 18 जुलैः निरा नदीत वीर धरणात करण्यात येणाऱ्या विसर्गाचे प्रमाण 17 जुलै 2022 पासून कमी करण्यात आले आहे. सध्या वीर धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे निरा नदीत होणारा विसर्ग कमी करण्यात आल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वीर धरणातून उजवा कालवा विद्युत गृहातून 500 क्यूसेकने तर डावा कालवा विद्युत गृहातून 400 क्यूसेकने नदी पात्रात विसर्ग सुरु आहे. सध्या निरा नदी पात्रात 4545 क्यूसेक इतका कमी केला आहे. तर सध्या 5445 क्यूसेकने नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यासह पावसाच्या प्रमाणावर विसर्गात बदल करण्यात येईल, असे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच नदी काठच्या गावांना धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. निरा नदी पात्र ही बारामती तालुक्यातील काही गावांतून वाहते. नदी पात्रात विसर्ग कमी झाला असला तरी बारामती तालुक्यातील गावातील ग्रामस्थांनी नदीत पात्रात उतरू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.