दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर भीषण स्फोट; आठ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

माळेगाव, 11 नोव्हेंबरः (विश्वजित खाटमोडे) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्गावरील सिग्नलजवळ सोमवारी (दि. 10) सायंकाळी जोरदार स्फोट झाला. या घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल व फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथक मंगळवारी (दि.11) सकाळपासून तपासासाठी तैनात आहे.

https://x.com/ANI/status/1988067375640723792?s=19



पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोट एका ह्युंडाई i20 कारमध्ये झाला. या स्फोटात काही वाहने नुकसानग्रस्त झाली आणि काही पादचारी जखमी झाले. प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी घटनास्थळी स्फोटकाचे काही अवशेष सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

https://x.com/ANI/status/1988062932069216647?s=19

सीसीटीव्ही फुटेज मिळाले

दिल्ली पोलिसांना मिळालेल्या फुटेजमध्ये संशयित व्यक्तीची कार स्फोटाच्या काही वेळ आधी आणि नंतर पार्किंग परिसरात दिसत असल्याचे दिसून आले आहे. त्या वेळी कारमध्ये फक्त एकच व्यक्ती असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या स्फोटाच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

गुन्हा दाखल

या प्रकरणी दिल्लीतील कोतवाली पोलिस ठाण्यात यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा, आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://x.com/ANI/status/1987911516205805946?s=19

गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय शी बोलताना सांगितले, “सोमवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग सिग्नलवर एका कारमध्ये स्फोट झाला. यात काही पादचारी जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटांत दिल्ली क्राईम ब्रांच व स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळी पोहोचली.” ते पुढे म्हणाले, “मी स्वतः दिल्ली पोलिस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. दोन्ही अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्व शक्यता तपासल्या जात असून लवकरच सविस्तर चौकशी अहवाल सार्वजनिक केला जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *