सातव- गुजर यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादीत बंडाळी; होळकरांची शिष्टाई

बारामती, 30 जानेवारीः राष्ट्रवादीमध्ये अलबेला नसल्याचे जाणवत असून बारामती तालुक्यातील आजी-माजी नगरसेवक, आजी- माजी जिल्हा परिषद सदस्य, राजकीय पुढारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेल्याचे स्पष्ट झाले आहेत. या बाबत बारामती शहरातील आजी- माजी नगरसेवकांनी आणि उपनगराध्यक्ष यांनी दुजारा दिला आहे. लवकरच प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित झाल्याचे बोलले जात आहे ते बंड थांबवण्याची जबाबदारी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे दिल्याचे समजते तर बंडखोरांची कुंडली काढण्यासंबंधी जोरात प्रयत्न सुरू आहेत.

मुर्टीमध्ये सुवासनी आणि विधवा महिलांचा हळदी कुंकू

साम-दाम-दंड-भेद वापरून हे बंड थांबवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात असल्याचे समजते. बारामती लोकसभा संघ जिंकण्यासाठी भाजप- शिंदे गटाची खेळी उधळून टाकण्याची मनो सुभा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. एक एक बंडखोराला व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन प्रेम युक्त दम दिला जात आहे. हे बंड यशस्वी झाल्यास खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक कठीण होणार, हे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बारामती एमआयडीसीमध्ये गांजाची तस्करी?

One Comment on “सातव- गुजर यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादीत बंडाळी; होळकरांची शिष्टाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *