आम्ही खोटे ठरलो तर फाशीची शिक्षा भोगायला तयार- रामदेव बाबा

हरिद्वार, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) सुप्रीम कोर्टाने योगगुरू रामदेव बाबा यांना पतंजली आयुर्वेद कंपनीच्या खोट्या जाहिरातींवरून फटकारले होते. त्यानंतर रामदेव बाबा यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “काही डॉक्टरांचा गट आहे तो सतत योग आणि आयुर्वेदाच्या विरोधात प्रचार करीत असतो. जर आम्ही खोटे बोललो तर आम्हाला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा. आमच्याकडून चूक झाली असेल तर आम्ही फाशीची शिक्षा भोगायलाही तयार आहोत.” असे रामदेव बाबांनी म्हटले आहे.

यावेळी रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेतली. “कालपासून वेगवेगळ्या मीडिया साइट्सवर एक बातमी व्हायरल झाली आहे की, सुप्रीम कोर्टाने पतंजलीला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर तुम्ही खोटा प्रचार केलात तर तुम्हाला दंड आकारण्यात येईल. आम्ही कोणताही खोटा प्रचार करत नाही. काही डॉक्टरांनी एक गट तयार केला आहे जो योग, आयुर्वेद इत्यादींच्या विरोधात सतत अपप्रचार करत असतो. आम्ही खोटे बोललो तर आम्हाला 1000 कोटी रुपये दंड करा, आणि आम्ही फाशीच्या शिक्षेलाही तयार आहोत. पण जर आपण खोटे नसलो तर जे खोटे प्रचार करत आहेत त्यांना शिक्षा करा. गेल्या 5 वर्षांपासून रामदेव आणि पतंजलीला टार्गेट करून अपप्रचार सुरू आहे.” असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.

असे फोटो व्हायरल करून प्रतिमा मलीन करता येत नाही – बावनकुळे

तत्पूर्वी, इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. पतंजली आयुर्वेद कंपनी त्यांच्या उत्पादनाच्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला होता. त्यावरील सुनावणीत कोर्टाने म्हटले होते की, “पतंजली आयुर्वेदाने असे सर्व खोटे आणि दिशाभूल करणे बंद करावे. अशा जाहिराती ताबडतोब बंद केल्या पाहिजेत अन्यथा त्यांच्या प्रत्येक उत्पादनावर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.” याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

2 Comments on “आम्ही खोटे ठरलो तर फाशीची शिक्षा भोगायला तयार- रामदेव बाबा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *