बारामती, 19 मार्च: बारामती मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे धों. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती यांना देखभाल दुरुस्तीसाठी दिले असताना, सदर स्टेडियमच्या दर्शनी भागात कारभारी जिमखाना हा अनाधिकृत बोर्ड लावला होता. या बेकायदेशीर कृत्यांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या नावाला लपवण्याच्या उद्देशाने कारभारी जिमखाना हे नाव देण्याचे कुटील कारस्थान या संस्थेच्या चालक मालकाने केला होता.
याविरूद्ध बारामती नगरीचे आक्रमक नेतृत्व बारामतीचा ढाण्या वाघ अन्यायाविरुद्ध लढणारे एक व्यक्तिमत्व रवींद्र पप्पूदादा सोनवणे यांनी या अपप्रवृत्ती विरुद्ध लढा दिला व धों. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती व बारामती नगरपरिषद ला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
तसेच आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी धों. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती यांनी आपली अरेरावी थांबवून स्वतः सदरचे होर्डिंग उतरवले आहे. याबद्दल रवींद्र पप्पूदादा सोनवणे यांचे समाजातून जबरदस्त अभिनंदन केले जात आहे सर्व भीमसैनिकांमध्ये क्रिकेट प्रेमींनी व खेळाडूंमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेले वादग्रस्त होल्डिंग्स काढल्याबद्दल आणि पुढील काळात कोणत्याही नावाचे होल्डिंग्स न लावण्याचे सूचना वजा आदेश संबंधितांना दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि यासर्व प्रकरणाचा यशस्वी पाठपुरावा करण्यासाठी माझ्यासोबत लढा देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील आभार!”
– रवींद्र (पप्पू) सोनवणे
या प्रकरणी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल रवींद्र (पप्पू) सोनवणे, अभिजित कांबळे, गणेश (भाईजी) सोनवणे, अक्षय गायकवाड, मोईन बागवान, मोहन (तात्या) शिंदे, अक्षय मेमाणे, सुमित सोनवणे, अमर भंडारे, गणेश जाधव, निलेश शेंडगे, इंद्रजित साळवे, सचिन शिंदे, सूरज मोरे, विजय मोरे, हैदर तांबोळी, विनोद काळे आदी सामाजिक कार्यकर्त्यांचे समाजबांधवांकडून कौतुक होत आहे.