पुणे, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेस नेते रवींद्र रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे आयुक्तालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी कल्याणी नगर अपघाताची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली,असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 23, 2024
कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण…
अन्यथा हे प्रकरण दाबले गेले असते
तत्पूर्वी, रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट केले होते. ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको, अशी भूमिका धंगेकर यांनी या ट्विटमधून मांडली आहे. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने 14 दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते, असे रवींद्र धंगेकर यावेळी म्हणाले.
आयुक्तांची बदली करण्यात यावी
आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरूवात पोलीस कमिशनर यांच्या पासून करायला हवी. या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनने कुणावरही कारवाई केलेली नाही, याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या डिल मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत, त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुणेकरांच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची आणि पोलीस प्रशासनाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या पोलीस कमिश्नर यांच्या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे, त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.