बारामती, 20 जून: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज बारामती येथे घेण्यात आली होती. ही बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत आंबेडकरी चळवळीतील तसेच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील धडाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभा साबळे यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच याप्रसंगी आशा मोहिते यांची पक्षाच्या सचिव पदी निवड करण्यात आली. या नियुक्त्या शशिकला वाघमारे यांच्याद्वारे करण्यात आल्या.
मागील अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी काम केल्याबद्दल तसेच गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल्याने, याची दखल घेऊन उपरोक्त नियुक्त्या या वरिष्ठांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या असल्याचे यावेळी बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी सांगितले.
या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा जयश्री जाधव, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, पुणे जिल्हा युवती अध्यक्षा सुप्रिया वाघमारे, पुणे जिल्हा महिला सरचिटणीस रजनी साळवे, बारामती तालुका महिला कार्याध्यक्षा पूनम घाडगे, दौंड मराठा आघाडी अध्यक्षा इंदुमती जगदाळे, उज्ज्वला लोंढे, आशा रंधवे, रुपाली सोनवणे आदी उपस्थित होते.