बारामती पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रेशन ग्राहक वंचित!

बारामती, 1 फेब्रुवारीः बारामती तालुक्यात रेशन दुकान धारकांच्या दुकानात अन्नधान्य आलं असून त्याचे वितरण ठप्प झाले आहे. अनेक दुकानात ई पॉज मशीनला संगणक डाटा आला नाही. यामुळे हे वितरण थांबल्याचे समजते. पुरवठा विभागाशी संपर्क केला असता अनेक दिवस हा डाटा उपलब्ध झाला नसल्यामुळे ग्राहकांना धान्य पुरवठा झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

देऊळगाव रसाळ गावात विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वसाधारण नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर डाटा मिळायला अजून किती दिवस लागतील?, हे सांगता येत नाही. त्यामुळे आधीच तालुक्यामध्ये रेशन काळा बाजाराला ऊत आला असताना रेशन काळा बाजाराला प्रशासन प्रोत्साहन तर देत नाही ना? अशी शंका रेशन ग्राहक विचारत आहे.

राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभाग प्रथम

One Comment on “बारामती पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रेशन ग्राहक वंचित!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *