रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार

मुंबई, 10 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (दि.09) निधन झाले. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी रात्री निधन झाले. दरम्यान, रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

https://x.com/ANI/status/1844215147298160899?t=aK9YXdJ5vkrHEqXjhQZLAQ&s=19

https://x.com/ANI/status/1844240115096486353?t=ZxKRSdsrk8sxnnc-9rtntQ&s=19

https://x.com/ANI/status/1844126615816859858?t=vq-67RTA71NGOAK5gOz6Uw&s=19

एनसीपीए येथे पार्थिवाचे अंत्यदर्शन

तत्पूर्वी, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून पहाटे तीनच्या सुमारास रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. रतन टाटा यांचे पार्थिव आता दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या (एनसीपीए) मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. जिथे लोकांना रतन टाटा यांचे शेवटचे दर्शन घेता येणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव याठिकाणी असणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वरळी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://x.com/RNTata2000/status/1843186838787526796?t=YGRavmZMmZ0w6ol8G_de0Q&s=19

दोन दिवसांपूर्वी तब्येत ठिक असल्याचे सांगितले होते

दरम्यान, रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली होती. 7 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांना मुंबईतील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे रतन टाटा यांनी स्वतः खंडन केले होते. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. “मला माझ्या आरोग्याबाबत अलीकडील अफवांची जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी पूर्णपणे निरोगी आहे आणि जनतेला आणि प्रसारमाध्यमांना विनंती करतो की चुकीची माहिती पसरवू नये,” असे रतन टाटा यांनी यामध्ये म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *