बारामतीत उद्या राष्ट्रीय समाज पक्षाचे ठिय्या आंदोलन

बारामती, 9 जूनः बारामती नगर परिषदेसमोर उद्या शुक्रवार, 10 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सदर ठिय्या आंदोलन हे राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) बारामती तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे. हे आंदोलन रासपचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे.

बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील (जळोची, रुई, तांदुळवाडी) गेल्या आठ महिन्यांपासून उभा असलेल्या स्ट्रिट लाईटच्या पोल वरती पथदिवे बसवणे यासह इतर मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

एकीकडे गेल्या आठ महिन्यांपासून वाढीव हद्दीत पोल बसवूनही पथदिवे लावले गेले नाही. तर दुसरीकडे बारामती नगरपरिषदेची वाढीव हद्द सोडून कन्हेरी येथील एका प्रसिद्ध डॉक्टरासाठी नगरपरिषदेने नियमांची पायमल्ली करत स्ट्रीट लाईट घरपोच करून दिली आहे. सामान्य नागरीकांकडून कराच्या स्वरुपात गोळा केलेला पैसा प्रसिद्ध डॉक्टराच्या वैयक्तिक फायद्यासाठी का केला, असा सवाल अ‍ॅड. अमोल सातकर यांनी केला आहे. या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी सदर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *