बारामतीत आढळली दुर्मिळ जातीची बिबट्यासदृश्य प्राण्याची पिल्ले

बारामती, 28 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील करंजेपुल येथे रविवारी, 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळच्या सुमारास बापूराव गायकवाड यांच्या उसाच्या फडात बिबट्यासदृश्य प्राण्याचे पिल्लू सापडले आहे. सदर पिल्लु हे बिबट्याचे असल्याबाबतची चर्चा ऊस मालक व आलेले ऊसतोड मजूर करत होते. मात्र वनविभाग अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी केली. ते मार्जार (मांजर) कुळातील अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या वाघाटी जातीचे पिल्लू आहे, असे स्पष्ट केल्यानंतर तेथील स्थानिकांचे शंकेचे निरसन झाले.

भाजप युवा मोर्चाकडून संविधान दिन साजरा

वनरक्षक योगेश कोकाटे यांच्या सूचनेनुसार वनमजुर अविनाश शेलार, नवनाथ रासकर यांनी वन्य प्राणिसंग्रहालय रेस्क्यू यांची टीम संपर्क साधला. रेस्क्यू टीम सोमेश्वर येथील सदर उसाच्या फडाला भेट दिला. त्या पिलांना ताब्यात घेत किरकोळ जखमांवर प्राथमिक उपचारासाठी बारामतीला रवाना केले आहे.

त्या पिलांना जीवदान देण्यासाठी शेतकरी बापुराव गायकवाड, कुंडलिक गायकवाड, विनोद गोलांडे, तसेच पोलिस कर्मचारी एस. एम. जवीर, होमगार्ड एम. एस. खोमणे यांनी मोलाचे सहकार्य केले. सध्या त्या पिल्लांची प्रकृती चांगली असून लवकरच ती पिल्ले तिच्या आईच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती वन संग्रहालय व वनमजूर कर्मचारी यांनी दिली आहे.

 

खंडूखैरेवाडीतील विद्यार्थ्याची कुस्ती स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम

One Comment on “बारामतीत आढळली दुर्मिळ जातीची बिबट्यासदृश्य प्राण्याची पिल्ले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *