रामदास कदम यांच्या वक्तव्याचा बारामतीत निषेध

बारामती, 22 सप्टेंबरः राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर पडत आहे. याच वक्तव्याच्या निषेधार्थ आज, 22 सप्टेंबर 2022 रोजी बारामती तालुका शहर शिवसेनेच्या वतीने भिगवण चौकात आंदोलन करण्यात आले.

सेवा पंधरवडा यशस्वी करण्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आवाहन

यावेळी शिवसैनिकांकडून माजी मंत्री कदमांच्या प्रतिकात्मिक चित्राला जोडी मारून जोरदार घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला. या जोडे मारो आंदोलनावेळी पोलिसांनी शिवसैनिकाच्या ताब्यातून फ्लेक्स घेतला.

शिंदे गटातील रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या आरोपाचा बारामती तालुका शिवसेना शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला पायदळी तुडविले. या आंदोलनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांही सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाआधीच बारामती शहर पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

बारामती शहर पोलीस आणि फायर ब्रिगेडने वाचवले युवकाचे प्राण

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, शहर प्रमुख पप्पू माने, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, निलेश मदने, राजेंद्र पिंगळे, बाळासाहेब गावडे, सुभाष वाघ, तालुकाप्रमुख उमेश दुबे, बंटी गायकवाड, संदीप तावरे, नितीन गायकवाड, कल्याण जाधव, कल्पना काटकर, निखिल देवकाते, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश करंजे यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *