रामदास आठवले यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान! बारामतीत रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

बारामती, 11 जून: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील पॅंथर संघर्षनायक रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात यावेळी रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्याबद्दल बारामती शहर आणि तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करण्यात आला.

याप्रसंगी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पु) सोनवणे, पुणे जिल्हा महिला सरचिटणीस रजनी साळवे, तसेच मोहम्मद शेख, युवराज गायकवाड, शुभम चव्हाण पत्रकार सुशील कांबळे ,सोनू जाधव, आर्यन काळे, साहिल सोनवणे यांसारख्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सलग तीनदा मिळाले मंत्रीपद!

दरम्यान, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष 2014 पासून एनडीए सोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्याकडे सर्वप्रथम 2016 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2019 च्या नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात देखील रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले. त्यानंतर आता ही रामदास आठवले यांच्याकडे याच खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *