बारामतीत रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बारामती, 9 फेब्रुवारीः बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे रमाई आंबेडकर यांची 7 फेब्रुवारी रोजी 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुरुषांसह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. या जयंती निमित्त प्रा. रमेश मोरे यांच्यासह उपस्थितांनी सामुदायिक त्रिसरण पंचशिल ग्रहण केले.

राज्यातील चौथी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊ नंतर भरणार! शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान, आमराई विभागातील भिमनगर येथून संकेत सोनवणे यांच्या संकल्पनेतून तसेच नेतृत्वात रमाई आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीला परिसरातील महिला वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदविला. सदर मिरणवणुक भिमनगर, महात्मा फुले नगर, सुहास नगर, सर्वोदय नगर, चंद्रमणीनगर आदी भागातून नेण्यात आली.

कल्पना बगाडे, वंदना मिसाळ, भारती यादव, साक्षी रणदिवे, संजवणी भोसले, वासंती अहिवळे, प्रिया अहिवळे, प्रेरणा अहिवळे, नूतन अहिवळे, लक्ष्मी चंदनशिवे, जयश्री सिमंदर, सोनाली लोंढे, पुनम यादव, नानी रणदिवे, सुजाता सोनवणे, दिपाली घोरपडे आदी महिला उपस्थित होत्या.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

यासह संकेत सोनवणे, अजय लोंढे, प्रफुल्ल वाघमारे, लखन मिसाळ, रिंकू चव्हाण, उदय गायकवाड, कुणाल उंबरे, आदित्य कांबळे, सुरज शिंदे, रुपेश साबळे, शुभम गायकवाड, दशरथ साबळे, ऋषभ मिसाळ, सोनू खरात, गिरीश रणदिवे, अनिश यादव, शुभम रणदिवे, आशिष भोसले, ओमकार माने, अनिकेत कांबळे, अंकुर भोसले, लखन चव्हाण, अनिकेत अहिवळे, शुभम कांबळे, सुशिल कांबळे, सोमनाथ रणदिवे, संतोष यादव, निलेश खरात, दत्ता गायकवाड, दत्ता रणदिवे, संतोष वाघमारे, गौतम शिंदे, हर्षद कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *