बारामती, 11 ऑगस्टः बारामतीचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. सध्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे कुटुंबासह मुंबई येथील घरी आहेत. सध्या रक्षा बंधन सण साजरा करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बारामतीच्या मुर्टी-लोणी भापकर रोडवर 1000 झाडांचे वृक्षारोपण
सदर व्हिडीओत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यासह सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि पुत्र विजय सुळे हे देखील रक्षाबंधन सण साजरा करताना दिसत आहे. राखी बाधून झाल्यानंतर सर्वांनी एकत्र फोटो देखील काढले आहेत. रक्षाबंधनाचा हा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबूक वरून शेअर केला आहे.
पवार आणि सुळे कुटुंब हे एकत्रितपणे वर्षातील सण साजरे करत असतात. सार्वजनिक जिवनात काम करताना अनेकदा पवार आणि सुळे कुटुंब हे राज्यात तसेच देशाच्या दौऱ्यांवर असतात. मात्र ऐन सणांच्या वेळी एकत्र येण्याची संधी ते सोडत नाहीत. असाच प्रकार हा आज भाऊ-बहिणीचे नातं दर्शवणाऱ्या रक्षाबंधन या सणातून समोर आला.