जेजुरी, 28 ऑगस्टः ( प्रतिनिधी- शरद भगत) जेजुरी येथील शिवशंभू मर्दानी शस्त्र व शास्त्र चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील मुर्टी गावाजवळील राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडुखैरेवाडी या शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे.
बारामतीच्या आशिषची एमपीएससी स्पर्धेत घवघवीत यश
या स्पर्धेमध्ये राज्यभरातून बहुसंख्य विद्यार्थी, प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दांडपट्टा, तलवार, लाठीकाठी व विविध प्रकारच्या मर्दानी खेळांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कुलच्या इयत्ता पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठीमध्ये सहभाग घेत गोल्डन, सिलव्हर आणि ब्रांझ मेडल सर्वात ज्यास्त मिळवली. याचबरोबर राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडुखैरेवाडीने प्रथम क्रमांक पटकवला.
बारामतीच्या ऋग्वेदची आतंरराष्टीय तायक्वोंदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
स्पर्धेच्या चषक वितरण कार्यक्रमाच्या वेळी वैभव जराड, राहुल यादव, रविंद्र जाधव, सुमित जगदाळे, रामदास खैरे आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप खैरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या प्रिंसिपल मनिषा खैरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर राहुल यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
One Comment on “राज्य स्तरीय शस्त्र व शास्त्र स्पर्धेत राजे प्रतिष्ठान प्रथम”