राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र त्यांच्या या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. याप्रसंगी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना 25 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम तारीख दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर देखील दुकानांवरील इंग्रजी पाट्या काढल्या नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनसे तर्फे विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून पुणे, मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरातील अशा काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

तसेच राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा टोल नाक्यांच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे. टोल टॅक्स हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. तसेच टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची मागणी राज ठाकरे यांनी यापूर्वी केली होती. काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयावर चर्चा करेन आणि मला काय प्रतिसाद मिळतो ते बघेन. असे राज ठाकरे हे गेल्या महिन्यात म्हणाले होते.

चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय

या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे टोल नाका प्रश्न आणि मराठी पाट्या संदर्भात सरकार निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 Comments on “राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *