बारामतीत पुन्हा पावसाला सुरुवात!

बारामती, 4 सप्टेंबरः बारामती शहरासह परिसरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. बारामती शहरासह परिसरात आज, 4 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांवर गंभीर आरोप?; चौकशीची मागणी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात उकाड्याने नागरिकांना हैराण केले होते. मात्र दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले. पावसाने उडीप दिल्यानंतर आज, चांगला पाऊस पडला आहे. आजच्या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *