धर्मशाळा, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.22) टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. दरम्यान आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे किंवा हा सामना कमी षटकांचा होण्याची शक्यता आहे.
तेज चक्रीवादळाचा जोर वाढणार!
या स्पर्धेतील टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघाचा हा पाचवा सामना असणार आहे. तत्पूर्वी झालेल्या चारही सामन्यात दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच गेल्या 20 वर्षांपासून विश्वचषकातील सामन्यात भारत हा न्यूझीलंडविरुद्ध जिंकलेला नाही. तर याच्या आधी 2003 च्या विश्वचषकामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. याशिवाय, 2019 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला घेण्याचाही भारतीय संघाचा विचार असणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना धक्का बसला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या
या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळणार नाही. त्याचवेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला देखील दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येणार नाही. त्यामुळे आज टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळते? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम कर्णधार असेल.
One Comment on “भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट”