बारामतीत काळाबाजार करणाऱ्या गॅस रिफील सेंटरवर छापा

बारामती, 12 फेब्रुवारीः पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून, बारामती शहरातील सर्वे नंबर 856 अशोक नगर या ठिकाणी मुजीब बागवान (रा. अशोक नगर) हा स्वतःच्या घराच्या बाजूला घरगुती वापरातील गॅस मशीनच्या सहाय्याने घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल गॅसमध्ये तसेच गाड्यांमध्ये तसेच छोट्या छोट्या एक किलो दोन किलोच्या गॅसमध्ये भरून चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, शाहू राणे जामदार यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये छापा मारला.

राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सदर छापेमारीत लहान मोठ्या 57 गॅस सिलेंडरच्या टाक्या मिळून आल्या. त्याची एकूण किंमत 74 हजार रुपये आहे. तसेच त्या ठिकाणी गॅस ट्रान्सफर करणाऱ्या मोटरी व मशीनसुद्धा मिळून आल्या. याप्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग केला. तर परिसरातील लोकांच्या जीवित सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून भादवी कलमाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.

आरटीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून आवाहन

तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत गानिभाई बागवान याला अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर आरोपी हा गॅस गजानन सुर्वे यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचे गॅस कोणत्या गॅस एजन्सीतून येत होते, याबाबत सुद्धा सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली.

One Comment on “बारामतीत काळाबाजार करणाऱ्या गॅस रिफील सेंटरवर छापा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *