मुंबई, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा अध्यक्षांनी आज शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर आपला निकाल जाहीर केला आहे. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले आहे. शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष असल्यामुळे भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवडणूक वैध आहे, असे राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
https://x.com/ANI/status/1745064380545597541?s=20
दोन्ही गटाच्या याचिका फेटाळल्या!
त्याचबरोबर ठाकरे आणि शिंदे गटाने एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका त्यांनी फेटाळल्या आहेत. या याचिकेत ठाकरे गटाने शिंदे गटाचे 16 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच शिंदे गटाने देखील ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र करावेत, अशी याचिका दाखल केली होती. मात्र, राहुल नार्वेकर यांनी या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र असल्याचा महत्वपूर्ण निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे.
https://x.com/ANI/status/1745076444542202129?s=20
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची!
शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष आहे, असे राहुल नार्वेकर यांनी या निकालात नमूद केले आहे. त्यामुळे भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवडणूक वैध ठरत असल्याने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्यात येत नाही, असे राहुल नार्वेकर यांनी हा निकाल वाचत असताना म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले नाही तर, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार आहे. दरम्यान या निकालाच्या विरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.