दिल्ली, 07 फेब्रुवारी: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि.07) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी 2024 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत उपस्थित होते.
https://x.com/ANI/status/1887762575846461480?t=DpW1eiMFJ2b-BKnxtwCfkw&s=19
https://x.com/ANI/status/1887765244107497576?t=Hymp5fksdU3_MWW5bZIOtw&s=19
39 लाख नवीन मतदार कुठून आले? राहुल गांधींचा सवाल
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “2019 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात 32 लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली. तर 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 39 लाख नवीन मतदारांची भर पडली. इतक्या कमी कालावधीत हे नवीन मतदार कोण आणि कुठून आले? याची स्पष्ट माहिती आम्हाला हवी आहे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी राज्यातील मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली असल्याचा देखील संशय व्यक्त केला आहे.
https://x.com/RahulGandhi/status/1887761593305292935?t=bS7wcoyc2G9toUVqWL-iFg&s=19
राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार?
महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. सरकारच्या माहितीनुसार, महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे, तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मतदारांची 9.7 कोटी आहे. म्हणजे महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत, असे निवडणूक आयोग देशातील जनतेला सांगत आहे, हे कसे होऊ शकते? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
आमची मते कमी झाली नाही, भाजपची कशी वाढली? – राहुल गांधी
पुढे राहुल गांधी म्हणाले की, “कामठीमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1.36 लाख मते मिळाली, आणि विधानसभा निवडणुकीतही जवळपास तितकीच मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकलो, तर लोकसभा निवडणुकीत भाजपला 1.19 लाख मते मिळाली होती. या भागात 35 हजार नवीन मतदार जोडले जातात. ते सर्वच्या सर्व 35 हजार मतदार भाजपच्या खात्यात मतदान करतात. भाजप निवडणूक जिंकली. महाराष्ट्रात असे अनेक उदाहरणे आहेत. आमच्या मतांमध्ये घट झाली नाही, पण भाजपची मते मात्र मोठ्या प्रमाणात वाढली,” असे राहुल गांधी म्हणाले.
मतदार यादी देण्याची मागणी
आम्ही कोणत्याही प्रकारचे आरोप करत नाही आहोत, परंतु आम्ही फक्त निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्राची मतदार यादी मागत आहोत. महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या अंतिम मतदार याद्या यामध्ये मतदारांचे नाव, पत्ता, आणि फोटो यांची माहिती निवडणूक आयोगाने आम्हाला लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे.