दिल्ली, 29 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ विश्वचषक स्पर्धेनंतर संपला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी कोणाची वर्णी लागणार? यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. तर याबाबत आता बीसीसीआयने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1729772852096700887?s=19
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून 4 दिवसीय महाराष्ट्र दौरा
त्यानूसार, बीसीसीआयने आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा करार वाढवला आहे. त्यामुळे राहुल द्रविड हे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत. प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्यासोबत कार्यकाळ वाढवण्यासंबंधी चर्चा केली होती. त्यानंतर राहुल द्रविड यांनी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यास सहमती दर्शवली. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. यावेळी बीसीसीआयने राहुल द्रविड यांचे कौतुक केले.
“राहुल द्रविडची दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम हे टीम इंडियाच्या यशाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडकडे केवळ आव्हाने स्वीकारण्याचीच नाही तर प्रगती करण्याची क्षमता आहे. मला आनंद झाला की त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली.” असे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी असे म्हणाले आहेत.
अवकाळी पावसामुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर शेती पिकांचे नुकसान – मुख्यमंत्री शिंदे
तर प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत. आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आमच्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि अभूतपूर्व प्रतिभा असल्याचा मला खरोखर अभिमान वाटतो.” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राहुल द्रविड हे 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
One Comment on “टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड कायम, बीसीसीआयची माहिती”