बारामती, 31 जुलैः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील जिरायत भागातील शेतीसाठी तथाकथित राजकीय लोकप्रतिनिधींनी अनेक महत्वकांक्षी योजना आणल्या. यामध्ये जिरायत भागात पुरंदर उपसा ही योजना प्रामुख्याने महत्वाची ठरली जाते. या योजनेमुळे खडकाळ जमिनीवर ही शेतकऱ्यांनी बागायत केली.
भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची निवड
पुणे जिल्हा आणि शहरातील सांडपाणी या योजनेद्वारे जिरायत भागातील शेतीला दिले जाते. या जिरायत भागातील शेती फक्त पावसावरच अवलंबुन असते. काही वर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकरी सुकवतो. पण एखाद्या वर्षी कडक दुष्काळ पडला तर शेतकरी, पशुपालक चिंताग्रस्ता होत असतात. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘धरण उशाला, कोरड घशाला’ या म्हणी नुसार पुरंदर उपस्याचे पाणी अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर असले तरी पुरंदर उपसा सिंचनचे अधिकाऱ्यांच्या सुचने प्रमाणेच शेतकरी ठरलेल्या रकमेपेक्षा ज्यास्त रक्कम दिली, तरच अधिकारी पाणी सोडतं असतात. त्यातून ही प्रामाणिक शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्या शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत पाणी बंद ही होते. मग शेतकरी पुन्हा हवालदिल होऊन जळक्या पिकांकडे पहात निराश होतो.
मोडवे गावात पीएम किसान योजनेचा हप्ता वितरीत
या योजनेमुळे अनेक शेतकरी, पशुपालक फार आशेने पाहतात, पण त्यांच्यावर कायम हताश होण्याचीच वेळ येते. याचे कारण शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाचा दुरुपयोग, सिंचनाची देखभाल, लाईट प्रॉब्लेम अशा नाना प्रकारच्या समस्या उद्भवत असल्याने जिरायत भागाला पुरंदर उपसा वरदान ठरेल, पण या साठी संबंधित लोकप्रतिनिधींनी या योजनेकडे गांभिर्याने लक्ष देऊन ही योजना व्यवस्थित चालवणयासाठी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा जिरायत भागातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
One Comment on “जिरायत भागासाठी वरदान ठरलेला पुरंदर उपसा शेतकऱ्यांना उपयुक्त?”