पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; आरोपीच्या वडिलांसह 6 जणांना न्यायालयीन कोठडी, 2 पोलीस अधिकारी निलंबित

नागपूर हिंसाचार प्रकरण - 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालसह 6 जणांना पुण्यातील कोर्टाने 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन असून, त्याची काल बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या अपघातावेळी हा आरोपी मुलगा मद्यधुंद अवस्थेत वेगात पोर्श कार चालवत होता. तसेच यावेळी त्याच्या पोर्श कारला नंबर प्लेट ही नव्हती.

https://twitter.com/ANI/status/1793975202050933226?s=19

आज कोर्टात हजर करण्यात आले

तत्पूर्वी, आपला मुलगा 17 वर्षांचा आहे. तसेच त्यांच्याकडे ड्रायव्हिंगचा वैध परवाना नाही, हे माहीत असूनही त्याच्याकडे कार दिल्याप्रकरणी विशाल अग्रवालच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी विशाल अग्रवालला पोलिसांनी 21 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. तसेच या अल्पवयीन आरोपी मुलाला दारू सर्व्ह केल्याप्रकरणी संबंधित पब मॅनेजमेंट मधील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोर्टाने या सर्वांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. अग्रवाल आणि इतर पाच आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले.

7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

यावेळी पुढील तपासासाठी विशाल अग्रवाल सहित 6 जणांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. तर दुसरीकडे आरोपींच्या वकिलांनी पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने विशाल अग्रवालसह 6 जणांना 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

https://twitter.com/ANI/status/1794010282676879534?s=19

दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

दरम्यान, पुणे कार अपघात प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती वायरलेस कंट्रोल रूमला न दिल्याने या पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *