कल्याणी नगर अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद, दिली महत्त्वाची माहिती

पुणे स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरण, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद

पुणे, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला 15 तासांतच जामीन मिळाला आहे. त्यावरून पुणे पोलिसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात होती. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी, कल्याणी नगर अपघात प्रकरणी काल रात्री पबच्या मॅनेजमेंट टीम मधील 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवालचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1792814449931272353?s=19

पोलीस आयुक्त काय म्हणाले?

या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पब मॅनेजमेंट टीम मधील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हा अपघात झाल्यानंतर पुणे पोलिसांनी 304 सह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच या अपघाताला कारणीभूत असलेल्या 17 वर्षीय मुलाच्या विरोधात प्रौढ म्हणून खटला चालविण्यात यावा, अशी मागणी आम्ही कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने आमची ही मागणी फेटाळून लावली, असे अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले आहे. आता या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा न्यायालयात अपील केल्याची माहिती अमितेश कुमार यांनी आज दिली आहे. त्यावर आज सुनावणी अपेक्षित आहे. आम्ही त्यावर कायदेशीर उपाय शोधत आहोत. तसेच याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, त्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ANI/status/1792090496627839095?s=19

अशी घडली घटना

दरम्यान, पुण्यातील कल्याणी नगर जवळ शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास पोर्श कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत एका तरूणीसह दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. अनीस अवडिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावे आहेत. त्यानंतर याप्रकरणी वेदांत अग्रवाल या 17 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली होती. या अपघातादरम्यान हा अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत वेगात कार चालवत असल्याचे आढळून आले होते. या अपघातानंतर संतापलेल्या जमावाने संबंधित कार चालकाला रस्त्यात चोप दिला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याच्या कारणावरून कोर्टाने त्याला जामीन दिला होता. तर कोर्टाच्या या निकालावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

https://twitter.com/AHindinews/status/1792789918835450114?s=19

पोलीस आयुक्तांना निलंबित करा: राऊत

त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. “पोलीस आयुक्तांना निलंबित करावे, त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तरूण जोडप्याचा खून करण्यात आला असून, आरोपीला इतक्या लवकर जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा मुलगा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र त्याचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोपींना कोण मदत करतंय? हे पोलीस आयुक्त कोण आहेत? त्यांना हटवावे, अन्यथा पुण्यातील जनता रस्त्यावर उतरेल,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *