बारामती, 30 सप्टेंबरः न्यायालयाच्या आदेशाने बारामतीमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासंबंधी आदेश झाले आहे. यामुळे पोलिसांच्या क्रूरकर्माची काळी चिट्टी जगासमोर आली आहे. या घटनेची दखल स्थानिक राज्य व आंतरराज्य वृत्त पत्रात देशपातळीवर दखल घेतल्याने जनसामान्यमध्ये पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
दौंड न्यायालयाने तत्कालीन बारामतीमध्ये पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पुण्याचे उपायुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोपटराव तावरे यांच्या विरोधात भारतीय दंड सहिता अनुसार 167, 192, 199, 198, 197, 200, 217, 218, 420, 409, 464, 418, 120 ब नुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा तक्रारदार आरती लवाटे व किरण भोसले यांच्या तक्रारीवरून दाखल झाला आहे.
बानपच्या ठेकेदाराला कामगार अप्पर आयुक्तांचा दणका
फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे बनवणे, खोटी कागदपत्रे बनवणे, खोटे प्रतिज्ञापत्र बनवणे, कायद्याचा चुकीचा वापर करणे, खोटी साक्ष पुरावे देणे, देवस्थानची जमीन हडपण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे न्यायालयाने पोलीस कार्यपद्धती बद्दल आक्षेप नोंदवला आहे.
पोलीस सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र या प्रकरणात तर पोलिसांनी अन्यायच केला. आर्थिक हित संबंधासाठी सर्वसामान्य जुलूम केल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या प्रकारात बारामती सत्र न्यायालयाने तत्कालीन पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील तसेच त्यांचे सहकारी महेश विधाते, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यास संबंधित चौकशी करण्याबाबत असा आदेश बारामती सत्र न्यायालयाने दिला आहे. पोलीस कर्मचारी व अधिकारी जर जातीय दृष्टिकोनातून विनयभंग करत असतील, तर बारामती तालुक्यातील आणि शहरातील किती महिला सुरक्षित असतील? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मागील सहा महिन्यापूर्वी सोनगाव येथे पोलिस धाड टाकायला गेले असता एक अनुसूचित जमातीचा इसम पाण्यात पडून मृत पावला. पोलिसांवर या प्रकरणात हल्ला झाला. मृत्यू आणि हल्ल्याप्रकरणी कुठलीही फिर्याद दाखल झाली नसून शासकीय अनुदान मृत्यू पडलेल्या इसमच्या कुटुंबाला अद्याप मिळालेला नाही. हे गंभीर प्रकरण कोणी व कसे मिटवले? या बाबत जनसामान्यांमध्ये उलट-सुलट चर्चा चालू आहे. स्वच्छ, चांगल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा उंचावते तसेच पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होतो. मात्र काही वाईट प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांनी खात्याची प्रतिमा बदनाम झाले आहे, एवढे मात्र निश्चित!