पुणे कार अपघात प्रकरण; सरकार कसलीही लपवाछपवी करीत नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुण्यातील जीबीएस साथीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरिकांना कच्चे चिकन टाळण्याचा सल्ला

पुणे, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे कार अपघात प्रकरणी राज्य सरकार कसलाही लपवाछपवी करीत नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. त्यांनी या प्रकरणाची सर्व माहिती घेतल्यानंतर पोलीस विभागाला कडक सूचना देऊन या अपघाताचा योग्य आणि सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1796829140743778659?s=19

अजित पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मी पण पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या संदर्भात सूचना दिल्या होत्या. परंतू एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसजस चौकशी पुढे जायला लागली, तसतस याप्रकरणात अनेकांचा सहभाग असल्याचे लक्षात यायला लागले. सुरूवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. हा जामीन सरकार देत नाही, जामीन हा कोर्टाने दिला होता. याबाबत मी काही बोलू शकत नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.



हा अपघात रात्री उशीरा झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात विविध कलमांच्या नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घातले तेव्हा याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टर देखील यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. हसन मुश्रीफ त्यावेळी परदेशात होते. परदेशातून आल्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयाची चौकशी केली. तसेच उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उत्पादन शुल्क खात्याला दिले आहेत, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

सरकार गांभीर्याने लक्ष देत आहे

या अपघाताच्या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत आहे. सरकार या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करीत आहे. रोज जसजसा तपास केला जात आहे. तसतसे जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात सर्वप्रथम मुलाला अटक करण्यात आली. नंतर त्याच्या बापाला अटक करण्यात आली. नंतर त्याच्या आजोबाला अटक करण्यात आली. आता याप्रकरणात या आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचे आढळले आहे. तर हे बदलण्यात आलेले रक्ताचे नमुने कोणाचे होते? याचा तपास केला जात आहे. असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे या अपघात प्रकरणात राज्य सरकार कसलीही लपवाछपवी करत नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *