पुण्याने मोडला चीनचा विश्वविक्रम! मोदींनी केले कौतुक

पुणे, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात येत्या 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव राष्ट्रीय पुस्तक ट्रस्टच्या (एनबीटी) वतीने आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. याच उपक्रमांतर्गत पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर काल पालक-बालक सामूहिक गोष्ट सांगण्याच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात 3066 पालकांनी सहभाग घेऊन आपल्या मुलांना सलग चार मिनिटे गोष्ट वाचून दाखवली. या विश्वविक्रमाची नोंद गिनीच बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

https://twitter.com/PMCPune/status/1735210087910920531?s=19

त्यामुळे पुणे शहराने आता नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम चीनच्या नावावर होता, ज्यामध्ये 2200 पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवली होती. पालकांनी आपल्या मुलांना वाचन करून कथाकथनाच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती रुजवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पुणेकरांच्या या विश्वविक्रमाचे कौतुक केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. “वाचनाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन!” असे पंतप्रधान मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1735252246525522347?s=19


या महोत्सवाला सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व प्रसेनजित फडणवीस, एनबीटीचे संचालक युवराज मलिक, प्रसिद्ध उद्योजक सूर्यकांत काकडे, पुणे बुक फिस्टचे राजेश पांडे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, अति. आयुक्त विकास ढाकणे, अभिनेत्री प्राजक्ता माळी व इतर अनेक दिग्गज कलावंतांनी हजेरी लावली होती. तर पुणे शहरात आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://twitter.com/PMCPune/status/1735177094068424859?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *