बारामती, 8 नोव्हेंबरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 7 नोव्हेंबर 2022 रोजी अपशब्द वापरून बेताल विधान केले. या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. अब्दुल सत्तारांच्या त्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मुंबई आणि औरंगाबाद येथील कृषिमंत्री सत्तार यांच्या घरावर दगड फेक केली. तसेच राज्याच्या विविध भागात सत्तारांच्या त्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे.
बारामतीत अडीच लाखांच्या कुस्तीचा सिकंदर ठरला मानकरी
अब्दुल सत्तार यांच्या त्या वादग्रस्त विधानाचे पडसाद बारामतीत आज, 8 नोव्हेंबर 2022 रोजी पडला आहे. बारामती तालुका आणि शहर राष्ट्रवादीच्या वतीने आज, मंगळवारी शहरातील भिगवण चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चामध्ये राष्ट्रवादीकडून दोन गाढवांना कृषिमंत्री सत्तार यांचा फोटो लावून धिंड काढली. तसेच अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच राष्ट्रवादीकडून शहरात निषेद मोर्चादेखील काढण्यात आला.
बारामतीत मायक्रोसॉफ्ट उभारणार कृषि प्रकल्प
या मोर्चावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नाना देवकाते, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, इम्तियाज शिकीलकर, योगेश जगताप, पौर्णिमा तावरे, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पप्पू बल्लाळ, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अप्पा अहिवळे, माजी नगर सेवक सचिन सातव, अमर धुमाळ, सूरज सातव, बापू बागल, साधू बल्लाळ, सूरज शिंदे, शक्ती भंडारी, गणेश भगत, श्रीरंग जमदाडे, किरण तावरे, कुंदन लालबिगे यासह पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 Comments on “बारामतीत राष्ट्रवादीकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध”