सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रामदास आठवलेंची बारामतीत या दिवशी जाहीर सभा

बारामती, 22 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची बारामतीमध्ये 25 एप्रिल 2024 रोजी जाहीर सभा होणार आहे. यासंदर्भातील माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती शहरात आज (दि.22) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या सूचनेनुसार आणि पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक संपन्न झाली.



या आढावा बैठकीत रामदास आठवले यांच्या बारामतीमध्ये 25 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सभेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे, तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, महिला तालुकाध्यक्षा सिमा चोपडे, महिला तालुका कार्याध्यक्षा पूनम घाडगे, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, महिला जिल्हा सरचिटणीस रजनी साळवे, सविता गायकवाड, प्रमोद खंडागळे, सिमा घोडपडे, आण्णा लांडगे आदी आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहर व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची बारामतीत जाहीर सभा पार पडणार आहे. रामदास आठवले यांची ही सभा यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा बारामती शहर व तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता जोमाने तयारी करेल, असे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी भारतीय नायक च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *