बारामतीत सायकल यात्रेतून सामाजिक संदेश देत जनजागृती

बारामती, 11 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मोरया सायकल क्लबच्या वतीने आयोजित तिर्थ क्षेत्र अष्टविनायक यात्रा मोरगाव ते मोरगाव अशी सायकलवारी अष्टविनायक तिर्थ क्षेत्रांना भेट देत गणरायाची पूजा आर्चा करत आहेत. यासह झाडे लावा-झाडे जगवा, मुलगी वाचवा, शरीर स्वास्थ्य टिकवा याबाबत सामाजिक संदेश देत जनजागृती करत आहेत.

अष्टविनायकामध्ये बारामती तालुक्यातील मोरगांवचा श्री मयुरेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगांवचा महागणपती हे गणपती येतात. ही मंदिरे मोरगांव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत.

भारत जोडो यात्रेत सुप्रिया सुळेंचा सहभाग

मोरया सायकल क्लबचे यंदाचे तीसरे वर्ष आहे. सायकल यात्रेच्या माध्यमातून वृक्षरोपण संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. मोरया सायकल क्लबने आतापर्यंत एक हजार झाडं लावलेली असून त्यांचे संगोपन करत आहेत. झाडे लावा-झाडे जगवा, मुलगी वाचवा, आरोग्य संभाळा असे विविध स्तुत्य उपक्रमातून सामाजिक संदेश देत आहेत. सायकलस्वार 630 कि. मी. चे अंतर चार दिवसात पूर्ण करतात. मोरगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात येतो.

कृषि विभागाकडून रब्बी पिकांच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन

मोरया सायकल क्लबचे सदस्य, सायकलस्वार विकास गुरव, काका भापकर, विश्वनाथ शिंदे, बाबुराव भापकर, सुधीर कोकाटे, रोहित गुरव, कौस्तुभ वाघ, रमाकांत तावरे, नितीन तावरे, नाना नेवसे, मोहन तावरे, अंकुश तावरे, डगळे सर, गणेश चौधरी, आदी गणेश भक्त सायकल यात्रेमध्ये सामील होतात.

2 Comments on “बारामतीत सायकल यात्रेतून सामाजिक संदेश देत जनजागृती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *